`मामू पर एक एहसान करना` बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भाचीसाठी सलमान खानची सुंदर पोस्ट
Salman Khan Alizeh Agnihotri: सलमान खानची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आताही त्याचीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं ट्विटरवरून आपल्या लाडक्या भाचीसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
Salman Khan Alizeh Agnihotri: सलमान खानची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्याच्या आगामी चित्रपटांचीही प्रेक्षकांना आतूरता लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वीच त्याच्या टायगर 3 सिनेमाचा पहिला लुक पाहायला मिळाला होता. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यातून यावेळीही खास आकर्षण म्हणजे आपल्याला सैफ अली खान आणि कतरिना कैफची जोडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टायगर 3 ची आतुरता प्रेक्षकांना अगदी शाहरूख खानच्या जवान आणि पठाणप्रमाणेच लागून राहिली आहे. ट्विटरवर सलमान खान फार लोकप्रिय आहे. त्याच्या एका ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
सलमान खान आपल्या परिवारासह अनेक स्पॉट होतो. आपल्या परिवारासाठी तो कायमच तत्पर असतो आणि सोबतच आपल्या परिवारासाठी वेळही काढतो. कुटुंबातल्या सदस्याचे तो अनेकदा कौतुक करतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो. अप्रिता खानसाठी सलमान खान किती काय काय करतो आहे आपल्याला माहितीच आहे. त्यातून त्या दोघांमधील भावा-बहिणीचे नातेही अनेकदा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सोशल मीडिायवरही त्यांचे अनेकदा कौतुक होताना दिसते. आता चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानच्या भाच्चीची. जशी अप्रिता खान ही सलमानची बहीण आहे तशीच अलविरा अग्निहोत्रीदेखील सलमान खानची बहीण आहे. त्या दोघांचेही नाते फार अनन्यसाधारण आहे.
हेही वाचा : जगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक
आपल्या याच बहीणीच्या लेकीला, अलिझेहसाठी एक हळवी पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवर सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. याचं निमित्त असं आहे की सलमानची ही लाडकी भाच्ची लवकरच बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे. 22 वर्षांच्या अलिझेहला आपण दबंग 3 मध्येही पाहिले असते परंतु तिच्या वडिलांनी नकार दिला होता. ती आता सौमेंद्र पाधी यांच्या चित्रपटातून दिसणार आहे.
काय म्हणतो सलमान?
''तुझ्या मामूवर एक उपकार कर. जे काम करशील ते अगदी मनापासून कर. आयुष्यात सरळमार्गाने जायचंय हे नेहमी लक्षात ठेव. तुझी स्पर्धा ही फक्त तुझ्याशीच आहे. इंडस्ट्रीत फिट होण्यासाठी इतरांसारखी वागू नकोस आणि काहीतरी वेगळं करून सर्वांपासून वेगळी होऊ नकोस. जर एखाद्याला शब्द किंवा वचन दिलंस तर तुझ्या मामूचंही ऐकू नकोस. ते वचन पूर्ण कर. ही गोष्ट कायम लक्षात ठेव.'', असा प्रेमाचा सल्ला आपल्या भाच्चीला त्यानं दिलाय.