Salman Khan : दबंग भाईजान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन दुचाकीस्वारांना गोळीबार केला त्या घटनेला आज एक महिना पूर्ण झालाय. याप्रकरणात पोलिसांना सहाव्या आरोपीला अटक केलीय. या संपूर्ण घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्णोईचा भाऊ अनमोल बिश्णोई याने घेतली आहे. अटकेत असलेल्या एका आरोपींनी घटनेच्या काही दिवसांनी जेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणादरम्यान दररोज नवे नवे ट्विस्ट पाहिला मिळतात. गोळीबारानंतर अभिनेत्याच्या घराबाहेरी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटीसह अनेक नेत्याने त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली. या सगळ्यामध्ये एक नवीन अपडेट समोर आली आहे. (Salman Khan ex girlfriend is ready to apologize in the blackbuck case but the Bishnoi community )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंडने बिश्णोई समाजाची माफी मागितली आहे. एकेकाळी सलमानवर आरोप करणारी आणि त्याला शिव्या घालणारी सोमी अली हिने बिश्णोई समाजाची माफी मागितली आहे.  सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे सोमीला आता अभिनेत्याच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. त्यामुळे सलमानला माफ करण्याची विनंती बिश्णोई समाजाला सोमीने केलीय. सोमीच्या आईलाही सलमान खानची काळजी वाटत आहे. सोमीच्या माफी मागण्यावर आता बिश्णोई समाजाने आपली प्रतिक्रिया दिला आहे. 


हेसुद्ध वाचा - Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक


अखिल भारतीय बिश्णोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितलं की, बिश्णोई समाजाने सोमी अलीची माफी नाकारली आहे. त्याशिवाय सलमान खानने त्या ठिकाणी जाऊन 27 वर्ष जुन्या प्रकरणात माफी मागितली तर सर्व गोष्टींवर तोडगा निघू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. यानंतर बिश्णोई समाजाचे लोक एकत्र बसून निर्णय या प्रकरणावर निर्णय घेतेल असंही ते म्हणाले. सलमान खानने आपली चूक मान्य करून माफी मागितली तरच त्याला माफ करता येईल, असं बिश्णोई समाजाचे लोकांचं म्हणं आहे. सलमान खानने बिश्णोई समाजाच्या मंदिरात येऊन माफी मागितली तर त्याला माफ करु असं यापूर्वीही सांगण्या आलं होतं. 


सोमी अलीने 1988 च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानबद्दल चिंता व्यक्त करत ती अभिनेत्याच्या वतीने माफी मागण्यास तयार असल्याच म्हटलंय. मात्र, बिश्णोई समाजाने त्यांची विनंती धुडकावून लावली असून समाजाने स्पष्ट सांगितलंय की, सोमीचा या प्रकरणात कोणताही दोष नसतानाही तिने माफी का मागायची?