Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड आता म्हणते, `खऱ्या प्रेमात खूपदा चुकले`
प्रेमात झाल्या या चुका....
मुंबई : नव्वदीच्या दशकात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सोबत रिलेशनशिपमध्ये असलेली आणि खूप चर्चेत राहिलेली सोमी अली (Somy Ali) पुन्हा एकदा एका नव्या विषयामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमी अलीने आपल्या प्रेमाबद्दल वक्तव्य केलं आहे.
सोमी अली म्हणते की, बॉलिवूडमधील तिचा प्रवास अतिशय छोटा राहिला आहे. सोमी हे देखील स्विकारते की, प्रेमामुळे तिने या काळात अनेक निर्णय घेतले. जी तिची तेव्हाची सर्वात मोठी चूक होती.
सोमी म्हणते, नो मोर टिअर्स
मयामीमध्ये राहणारी अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) पुढे म्हणते की, तिला असं कधीच वाटलं नाही की ती सिनेसृष्टीत कधी फिट होऊ शकते. १९९१ मध्ये मुंबईत आलेल्या सोनीने १९९९मध्ये भारत सोडलं. यानंतर तिने 'नो मोर टिअर्स' नावाची एक संस्था निर्माण केली.
सोमी अलीने म्हटलं की,'मी स्वतःला खूप मोठी बॉलिवूड स्टार समजत नाही. माझ्या प्रवासाची सुरूवात नशिबाने झाली आहे. जेव्हा मी मुंबईत आली होती तेव्हा मी टीनएजरमध्ये होती. पण त्यावेळी मी कसं मोठ्या १० स्टार्ससोबत काम केलं याचं मला कौतुक वाटतं आहे. तेव्हा अभिनयात करिअर करण्याचा माझा काहीच विचार नव्हता. त्याकाळात मी खूप साधी होती सहज लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होती.'
सोमी अलीने पुढे म्हटलं की,'खऱ्या प्रेमाच्या शोधात मी अनेक चुका केल्या. चुका करूनही मला खरं प्रेम मिळालेलं नाही. पण याचा मला काही पश्चाताप नाही. कारण मी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी मी माझ्या मनाने केल्या आहेत. त्याचे परिणाम काहीही असो मला कोणत्याच लेबलचा कधी विचार केला नाही. मी बोल्ड होते पण मूर्ख नव्हते. मी समजुतदार होते पण स्वतःला वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवत असे. '