Somy Ali Salman Khan: आत्तापर्यंत सलमान खान आणि त्याच्या अफेअरची (Salman Khan Girlfriends) खूप चर्चा होत आली आहे. कधी लोकप्रिय अभिनेत्रींसोबत सलमान खानचे लिंकअप होते तर कधी मॉडेल्ससोबत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan News) कधी लग्न करणार असा प्रश्न त्याचे चाहते त्याला कायमच विचारात आले आहेत. परंतु त्याचसोबतच सलमानच्या आधीच्या गर्लफ्रेंडच्याही (Salman Khan Girlfriends) अनेकदा चर्चा होताना दिसतात. डिसेंबरमध्ये सलमान खानच्या 57 व्या वाढदिवशी त्याची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) हिनं हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. (salman khan ex girlfriend somy ali shares video on instagram stating salman should say sorry to her and confess what he did to her)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमाननं आपल्या एक्स-गर्लफ्रेंडच्या कपाळावर किस करून तिच्यासोबत खास फोटोज काढले होते त्याचबरोबर संगीतानंही आपल्या खास मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु संगीताच्या आधी सर्वात जास्त चर्चेत आलेली व्यक्ती होती ती म्हणजे सोमी अली (Somy Ali). सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं त्याच्यावर याआधीही हिंसाचाराचे आरोप केले होते. सध्या सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 


सोमी अलीनं याआधी सलमान खानवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यामुळे सलमान खान अडचणीत आला होता. आता सोमी अलीनं पुम्हा एकदा सलमान खानवर आरोप करत त्यानं तिची माफी मागावी आणि त्यानं तिच्यासोबत जे काही केलं ते त्यानं कबूल करावं असं म्हणत एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये नक्की सोमी अलीनं काय म्हटलं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओसुद्धा (Somy Ali) सगळीकडे व्हायरल होतो आहे. 


सलमान खानवर आरोप 


तिनं या व्हिडीतून म्हटलं आहे की, ''मिस्टर खान जरा आरशात पाहा आणि स्वत:ला विचार की तुम्ही कधी माझी माफी मागू शकाल का, तुम्ही कधी माझ्यावर हात उचलला नाही, माझ्यावर शिवीगाळ केली नाही. हे तुम्ही जगाला सांगूच शकत नाही कारण तुम्ही हे धाडस करू दाखवा, तुम्ही ते करूच शकतं नाही थोडी तरी लाज बाळगा.'' 


तू माझं कितीही काम माझ्यापासून काढायचा प्रयत्न केलास तरी त्याच्या काही फायदा नाही माझी मेहनत नक्कीच फळाला येईल, असंही तिनं म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आपल्यावर केलेल्या वर्बल, मेंटल आणि फिजिकल अब्यूजसाठी सलमान खाननं माफी मागावी असं तिनं या व्हिडीओत म्हटलं आहे. सोमी अलीनं व्हिडीओनं सलमान खानला उद्देशून म्हटलं आहे की, ''माझी इच्छा आहे की, सलमान खाननं माझी माफी मागावी कारण त्यानं माझा शाब्दिक, मानसिक आणि शारिरीक (Abuse on Women) छळ केला आहे. त्यानं अख्ख्या जगासमोर माझी माफी मागावी. परंतु एक आत्मकेंद्री आणि घमंडी व्यक्ती असा मोठेपणा कधीच दाखवणार नाही असं तिनं म्हटलं आहे.''