अमिताभ बच्चन यांची' ती' फ्लॉप अभिनेत्री, कारकिर्दीत केवळ 3 चित्रपट... पण आता 500 कोटींची मालकिन

Entertainment : बॉलिवूडमधली एक अशी अभिनेत्री जिला कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटात तीने कौतुकाची थाप मिळवली. पण कारकिर्दीत तिने केवळ 3 चित्रपटातच काम केलं. आज ही अभिनेत्री तब्बल 500 कोटींच्या संपत्तीची मालकिन आहे. 

| Sep 26, 2024, 19:22 PM IST
1/7

अमिताभ बच्चन यांची' ती' फ्लॉप अभिनेत्री, कारकिर्दीत केवळ 3 चित्रपट... पण आता 500 कोटींची मालकिन

2/7

बॉलिवूडमध्ये असे अनेक चाइल्ड आर्टिस्ट आहेत, ज्यांना लहानपणी भरपूर प्रसिद्धी मिळाली, पण मोठेपणी लीड रोलची संधीच मिळाली नाही. अशीच एक अभिनेत्री आहे जीने चाईल्ड आर्टिस्ट काम केलं आणि रातोरात स्टार बनली. पण यानंतर ती कधीच लीड रोलमध्ये दिसली नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधमि मिळाली.

3/7

या अभिनेत्रीचं नाव आहे आयशा कपूर. आयशा ही इंडियन-जर्मन अभिनेत्री आहे. बॉलिवूडमधल्या गाजलेल्या ब्लॅक चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. आयशाने या चित्रपटात राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन हे शिक्षकाच्या भूमिकेत होते.

4/7

आयशाचं पूर्ण नाव आयशा गिऊलिया कपूर आहे. तिचा जन्म 13 सप्टेंबर 1994 मध्ये पद्दुचेरी इथं झाला. तिच्या आईचं नाव जॅकलीन असून ती जर्मनीची आहे. तर वडिलांचं नाव दिलीप कपूर असून ते पंजाबी उद्योगपती आहेत.

5/7

आयशाच्या अभिनयाची सुरुवात 2005 मध्ये लीला भन्साली यांच्या 'ब्लॅक' चित्रपटापासून झाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी आयशाला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर आयशा 2009 मध्ये आलेल्या सिंकदर चित्रपटात दिसली होती. यात तीने एका काश्मिरी मुस्लिम मुलीची भूमिका साकारली होती. 

6/7

आयशाने अभिनय कारकिर्दीत केवळ दोनच चित्रपट केले. ब्लॅक आणि सिंकदर. याशिवाय तिचा आणखी एक चित्रपट येतोय त्याचं नाव आहे 'हरि ओम' दोन चित्रपटांशिवाय गेल्या वर्षी आयशाने वेब सीरिज 'स्वीट कारम कॉफी' त काम केलं आहे. 

7/7

आयशाचे वडिल मोठे उद्योगपती आहेत. त्यांचा लेदरचा व्यवसाय आहे. बॅग, लेडीज पर्स ते चामड्याच्या इतर वस्तू बनवल्या जातात. त्यांच्या कंपनीचं नाव आहे Hidesign. कंपनीचं हेडक्वार्टर चेन्नईत असून हिडिजाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं आताचा टर्नओव्हर जवळपास 500 कोटींचा आहे.