भारतातील एकमेव गाव, जिथे प्राण्यांना दिली जाते रविवारची सुट्टी

भारतात भुतदया फार महत्त्वाची मानली जाते. मात्र एक असे गाव आहे, जेथे प्राणी माणसांप्रमाणे आराम करतात. रविवारची आतुरता माणसांबरोबर प्राण्यांनासुद्धा असते.   

Sep 26, 2024, 19:33 PM IST

तुम्ही पण आराम करा आम्ही पण करतो, भारतातले असे गाव जिथे प्राण्यांनाही रविवारी सुट्टी असते. या गावात रविवारी कोणीच काम करत नाही. सर्वांना आराम करणे बंधनकारक आहे. 

 

1/7

भुतदया

भारतात भुतदया, प्राणीप्रेम, इत्यादी जनावरांप्रती भावना सर्वत्र पहायला मिळतात. काही प्राणी तर भारतात पुजनिय आहेत. बैलपोळ्यासारख्या सणांतून प्राण्यांप्रती मानवाचा असलेला जिव्हाळा, आदर, प्रेम आदी. भावना दिसुन येतात. बरीच अशी कामे आहेत, जी करण्याची जबाबदारी या प्राण्यांवर असते. 

2/7

शेतीसाठी प्राणी गरजेचे

नांगर चालवण्यापासुन, माल वाहतुक करण्यापर्यंत अनेक कामे प्राण्यांमार्फत केली जातात. फक्त हौसेसाठी प्राणी पाळणारे लोक असले तरी, प्राण्यांचे पालन प्रथमतः माणूस करु शकणार नाही, अशी कामे करण्यासाठी केला गेले होते.        

3/7

प्राण्यांची कार्यक्षमता

प्राण्यांची कार्यक्षमता मानवापेक्षा जास्त असली तरी, तोसुद्धा एक जीव आहे. मानवी शरीराला जशी आरामाची गरज असते, तशी प्राण्यांनासुद्धा असते. भारतातच नाही तर सर्वत्रच पशुपालन केले जाते. अतिकामामुळे जीव गमवावा लागणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. असा त्रास प्राण्यांना होऊ नये म्हणुन, भारतातील एका गावातील गावकऱ्यांनी माणसांप्रमाणे, प्राण्यांना एका दिवसाची सुट्टी द्यायचा निर्णय घेतला. 

4/7

रविवार

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस शाळा, महाविद्यालये, कार्यालये आदी. ठिकाणांना रविवारी सुट्टी असते. त्यामुळ लोक रविवारची आतुरतेने वाट बघतात. सातही वारांपैकी रविवार सर्वांना प्रिय असलेला वार असतो. भारतातील या गावात मात्र लोकांबरोबर प्राण्यांनाही रविवार प्रिय आहे

5/7

लातेहार गाव

प्राण्यांना रविवारची सुट्टी देण्याची पद्धत झारखंडमधील 'लातेहार' या गावातून सुरू झाली. या गावातील लोकांकडून प्रेरणा घेऊन शेजारील हर्खा, लालगडी, पक्कर, मुंगर आदी गावातसुद्धा प्राण्यांना रविवारी सुट्टी मिळू लागली.

6/7

रविवार निवांतात

रविवारी या गावात कोणालाच कामं करायचं बंधन नाही. खास करुन रविवार प्राण्यांना कोणतेही काम करु द्यायचे नाही, हा या गावातील नियम आहे.     

7/7

विचारा मागील कारण

गावकरी सांगतात दशकांपूर्वी या गावात एका बैलाचा मृत्यू झाला होता. बैल आठवड्याचे सातही दिवस राबराब राबायचा. त्याचे शरीर एवढा ताण सहन नाही करु शकले. तेव्हापासून गावकऱ्यांनी ठरवले की, गावातील प्राण्यांना त्रास होईपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घ्यायचे नाही.