सलमानच्या फॅन्सचे कतरिनासोबत गैरवर्तन
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या द बॅंग टूरसाठी कॅनडात आहे.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या द बॅंग टूरसाठी कॅनडात आहे. या टूरवर सलमानसोबत कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडीस, मनीष पॉल, गुरु रंधावा यांसारखे स्टार्स देखील आहेत. पण याचदरम्यान सलमान खानच्या काही फॅन्सने कतरिनासोबत गैरवर्तवणूक केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा काय घडले नेमके...
मिनिटाभराचा हा व्हिडिओ असून त्यात कतरिना कैफ आपल्या हॉटेलमधून बाहेर पडून कारकडे जात आहे. सिक्युरीटी गार्डच्या घोळक्यातून कतरिना जात असताना तिथे उभी असलेली महिला जोरात ओरडते, आम्ही तुझ्यासोबत फोटो नाही घेणार... यावर कतरिना म्हणते, तुम्हाला अशाप्रकारे बोलणे शोभत नाही. मी खूप थकली आहे कारण माझा शो खूप वेळ सुरु होता. त्याचबरोबर कतरिना त्यांना शांत राहण्यास सांगते.
तेव्हा तिथे उभे असलेले चाहते कतरिनासोबत सेल्फी घेऊ लागतात आणि कतरिनाही हसून सेल्फी काढते. तेव्हा मागून पुन्हा तीच महीला म्हणते, तुला तुझी वागणूक चांगली ठेवायला हवी. लोक तुला अभिनेत्री म्हणतात. पण जेव्हा तू त्यांना भेटतेस तेव्हा तू त्यांना दुर्लक्षित करतेस. यानंतरही कतरिनाने त्यांना प्रेमाने शांत राहण्यास सांगितले.
कतरिनाला जबरदस्त मानधन
सलमानच्या या शो मधून कतरिनाला उत्तम मानधन मिळत असून सलमाननंतर या टूरवर कतरिनाचं मोठी स्टार आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिनाला या पूर्ण टूरसाठी १२ कोटी रुपये दिले जात आहेत. तर जॅकलिन आणि सोनाक्षीला ६-८ कोटी दिले जात आहेत.