Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात त्यांनी आता 6 व्या आरोपीला अटक केली आहे. तर पोलिसांनी या आरोपीला हरियाणाच्या फतेहाबादमध्ये अटक केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीचं नाव हरपाल सिंग आहे. तर हरपाल हा 37 वर्षांचा आहे. तर आज या आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीचे नाव हरपाल सिंह असल्याचं कळतंय. पोलिसांनी हरियाणाच्या फतेहबादमध्ये हरपालच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या प्रकरणात हरपालनं मोहम्मद रफीक चौधरी याला आर्थिक मदत केल्याचं तसंच सलमान खान आणि आसपासच्या परिसरात रेखी कर असं सांगितल्याचं कळतंय. 


या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विकी गुप्ता, सागर पाल, अनुज थापन, सोनू बिश्नोई, मोहम्मद रफिक चौधरी, आणि हरपालला अटक केले आहे. दरम्यान अनुज थापन या आरोपीने पोलीस कस्टडीमध्ये स्वतःच जीवन संपवलं. याप्रकरणी स्थापनच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी देखील केली आहे


दरम्यान, असं म्हटलं जातं की क्राइम ब्रांचची टीम जवळपास चार दिवस भिरडाना येथे होते. टीमनं तिथल्या मोबाई दुकानांमध्ये तपास केला आणि हॅरी उर्फ हरपाल विषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केल. हॅरी उर्फी हरपालला क्राइम ब्रांचच्या टीमनं कोर्टात पेश केलं आहे. तर त्यांनी त्याची 4 दिवसांची ट्रांजिट रिमांड मागितली आहे. पण कोर्टानं हॅरीला दोन दिवसांची ट्रांजिट रिमांड दिली आहे. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रांच त्याला घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले.


हेही वाचा : काळवीट प्रकरणी Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड माफी मागायला तयार, पण बिश्णोई समाजाने...


मुंबईच्या क्राइम ब्रांच टीमनं आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली असून त्यात दोन शार्प शूटर्स देखील आहेत. या फायरिंग प्रकरणात गॅन्गस्टर लॉरेंस बिश्नई आणि त्याचा भाऊ अनमोल देखील आरोपी आहे. या दोघांच्या सांगण्यानंतर हे सगळं प्रकरण झाल्याचं समोर आलं आहे.