मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या बहुचर्चित सिनेमा भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचे शूटिंग माल्टामध्ये सुरु आहे. यादरमान्य सलमान खानने केलेल्या ट्वीटमुळे त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या सलमानने देशाचे माजी पंतप्रधान, कवी आणि दिग्गज नेता अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर ५ दिवसांनी त्यावर शोक व्यक्त केला. यामुळेच सलमानला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. सलमान खानने ट्वीट केले की, एक महान नेता, दिग्गज राजनेता, वक्ता आणि एक श्रेष्ठ नेते अटलजींच्या निधनामुळे मी दुःखी आहे. सलमानच्या या ट्वीटची युजर्सने चांगलीच खिल्ली उडवली.
एका युजरने लिहिले की, खूप दिवसानंतर आठवण आली सर. तर दुसऱ्याने म्हटले, टायगर झोपला होता. 



अटलींशिवाय केरळातील पीडितांसाठी सलमान खानने ट्वीट केले. त्यात सलमानने लिहिले की, केरळमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मी अजूनही धक्क्यात आहे. माझी संवेदना पुरग्रस्तांसोबत आहे. पण मदतीसाठी पुढे आलेल्या लोकांसाठी मी खूप खूश आहे. पण या ट्वीटवर सलमान ट्रोल झाला नाही.


देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला. अनेक राजनेत्यांसह बॉलिवूड दिग्गजांनीही सोशल मीडियावरुन अटलींना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबरर केरळात झालेल्या भयंकर पावसामुळे ३५० हुन अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर लाखो लोक बेघर झाले.



सलमान खान, कतरिना कैफ आणि दिशा पटानी यांचा भारत सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.