सलमान खानच्या नव्या शोचं काम लवकरच सुरू होणार
अभिनेता सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली सुप्रसिद्ध गामा पहेलवानच्या जीवनावर एक शो तयार करत आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली सुप्रसिद्ध गामा पहेलवानच्या जीवनावर एक शो तयार करत आहे.
कोण असणार मुख्य भूमिकेत?
पुढील काही महिन्यात या शोचं काम सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचा भाऊ सोहेल खान यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गामा पहेलवानच्या भावाच्या भूमिकेत मोहम्मद नजीम दिसणार आहे.
हे करणार दिग्दर्शन
गामा पहेलवानचं खरं नाव गुलाम मोहम्मद होतं. आपल्या पाच दशक लांब करिअरमध्ये गामा पहेलवानाने कधीही पराभव पाहिला नाही. सलमान खानच्या या प्रोजेक्टचं बजेट खूप जास्त असल्याचंही बोललं जात आहे. लहान आणि मोठ्या पडद्यावर व्हिलनच्या भूमिकेत दिसलेले पुनीत इस्सार याची कथा लिहित आहेत. तेच या शोचं दिग्दर्शन करतील.
इथे होणार शूट
असेही बोलले जात आहे की, गेल्यावर्षी पटियालामध्ये या शोचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. आता या शोच्या सर्वच कलाकारांच्या डेट्स घेतल्या गेल्या आहे. तसेच या शोचं शूट एका सिनेमाप्रमाणे पंजाब आणि मुंबईतील सेटवर त्यासोबतच लंडनच्या स्टेडियमध्ये केलं जाणार आहे.