२९ वर्षांपूर्वीचा तो नियम आजही पाळतो सलमान खान
सलमान खान याला बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करून नुकतीच २९ वर्षे झाली. आपल्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खानने अॅक्शनपासून ते रोमान्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारातील सिनेमांमध्ये कामे केली.
मुंबई : सलमान खान याला बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करून नुकतीच २९ वर्षे झाली. आपल्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खानने अॅक्शनपासून ते रोमान्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारातील सिनेमांमध्ये कामे केली.
आज तो सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यांमध्ये आहे. अनेक अभिनेत्रींना सलमानसोबत काम करण्याची इच्छा असते. सलमानच्या सर्व गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच आतुरता असते. मात्र, सलमानची एक अशी गोष्ट आहे जी फार लोकांना माहितीच नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान याने सिनेमात येण्याआधीच स्व:ताशी अशी गाठ बांधून ठेवली होती की, कधीही पडद्यावर अभिनेत्रीला किस करणार नाही. हा त्याने स्वत:शी केलेला निश्चय आजपर्यंत त्याने पाळला आहे. सध्या सिनेमांकडे एक नजर टाकली तर प्रत्येक सिनेमात इंटिमेट सीन्स, किसींग सीन्स स्क्रिप्टची डिमांड म्हणून टाकले जातात. मात्र, सलमान खान खान मंडळींपैकी एकुलता एक असा खान आहे ज्याने आजपर्यंत ऑनस्क्रिन किस केला नाही. तरीही त्याचे सिनेमे चालतात.
सलमान खानच्या सिनेमात रोमान्स भरपूर असतो. मात्र कधीही तो किस करताना दिसला नाही. सलमान खानने करिअरची सुरूवात केली होती तेव्हापासून हा नियम पाळला आहे. तसा सलमान खान याने पहिला लिपलॉक सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमात भाग्यश्री सोबत केला होता. मात्र सलमानने या सीनमध्ये भाग्यश्रीला हात सुद्धा लावला नव्हता.
सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही त्यांच्या करिअरची सुरूवात या सिनेमातून केली होती. या सिनेमात एक किसींग सीन होता. पण दोघांनीही हा सीन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सूरत बडजात्या यांनी हा सीन शूट करताना दोघांच्या मधे एक काच ठेवून त्यानंतर सीन शूट केला गेला. त्यानंतर सलमाने पुन्हा कधीही असा सीन दिला नाही.