मुंबई : कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.  बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा (Salman Khan ) ड्रायव्हर (Driver) आणि दोन स्टाफला (Two Staff) कोरोनाची लागण  (Corona Positive) झाली आहे. स्वतः सलमान खान आयसोलेटमध्ये आहे. सलमान आता बिग बॉस-१४ होस्ट करत होता. पण आयसोलेट असल्यामुळे पुढील शुटिंगचं नेमकं कसं करणार हा प्रश्न आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच सलमान खानने नुकतीच 'राधे' सिनेमाची शुटिंग पूर्ण केली आहे. या सिनेमांत त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे. लॉकडाऊनमध्ये सिनेसृष्टीची सगळीच काम थांबली होती. पण गेल्या २-३ महिन्यात ही काम सर्व नियम पाळत सुरू झाली. पण अजून कोरोना गेलेला नाही. संपूर्ण देशाला अजूनही कोरोनाची भीती आहे. 


सलमान खानने मंगळवारी शर्टलेस होत एक फोटो शेअर केला होता. पण आता सलमान खानच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहत्यांना थोडं मुकावं लागेल कारण सलमान आयसोलेशनमध्ये आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचे १७ लाखहून अधिक रूग्ण


महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाखांच्या पार गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १७ लाख ५७ हजारहून अधिक केस आढळले. तर ४६ हजार २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाचे ८० हजार २२१ ऍक्टिव केस आहेत. १६ लाख ३० हजार १११ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत कोरोनाचे २ लाख ७१ हजार ५००हून अधिक केस आहेत. तर १० हजार ६१५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.