मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहचे सर्वदूर पसरलेले आहेत. सलमानची नवी स्टायल असो किंवा चित्रपट चर्चा कायम रंगलेली असते. सलमानचे आगामी चित्रपट फक्त चर्चेत नसतात तर त्याचे जुने चित्रपट देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. आता चर्चा रंगत आहे ती सलमानच्या 'मुझसे शादी करोगी' चित्रपटाबद्दल. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली. चित्रपटातील 'जीने के है चार दिन' गाण्यात सलमाने टॉवेलसोबत जी स्टेप केली ती आजही चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जीने के है चार दिन' गाण्यात सलमाने वापलेला टॉवेल निलाम करण्यात आला आहे. निलाम झाल्यानंतर त्या टॉवेलची जी किंमत आली ती सर्वांचा चक्क करणारी आहे. रिपोर्टनुसार निलामीनंतर सलमानच्या या टॉवलची किंमत 1 लाख 42 हजार इतकी आहे. एका 100 रूपये टॉवेलची भलीमोठी किंमत आल्यामुळे सर्वचं हैराण झाले आहेत.



सांगायचं झालं तर सलमानच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. साजिद नाडियाडवाला निर्मित 'मुझसे शादी करोगे' चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमरीश पुरी, कादर खान, सतीश शाह आणि राजपाल मुख्यभूमिकेत दिसले. चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला असला तरी टॉवेलमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.