Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review : 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट आज 21 एप्रिल रोजी ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याचे आगावू बूकिंग खूप मोठ्या प्रमाणात सुरु होते. नक्की त्याच असं काय आहे की जे पाहण्यासाठी प्रक्षेक आतुर होते की बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पाहण्यासाठी? असा प्रश्न देखील उपस्थित होता. चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे, दग्गुबाती वेंकटेश, पलक तिवारी, जस्सी गिल, शहनाज गिल आणि राघव जुयाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. जर तुम्ही विकेंडला हा चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल तर हा रिव्ह्यू नक्की वाचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या पटकथेविषयी सांगायचं झालं तर दिल्लीत राहणाऱ्या चार भावांपासून या चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात भाईजान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या तीन भावांसोबत राहत असतो. त्याच्या तीन भावांची नाव लव, मोह आणि इश्क असं आहे. तर भावांना सांभाळण्यासाठी भाईजान लग्न करत नाही. कारण त्याला वाटतं जर त्यानं लग्न केलं तर एका स्त्रीमुळे तो त्याच्या भावांपासून दूर जाऊ शकतो. पण या तीघ भावांना प्रेम होतं. थोडक्यात ते रिलेशनशिपमध्ये येतात.  पुढे ट्विस्ट म्हणजे हे तीघं भाऊ त्यांच्या रिलेशनशिपविषयी भाईजानला सांगायच्या जागी त्यांच्यासाठी मुलगी शोधू लागतात. त्याचवेळी भाईजानच्या आयुष्यात भाग्यलक्ष्मी येते. चित्रपटात भाग्यलक्ष्मी ही भूमिका पूजा हेगडेनं साकारली आहे. भाईजानचं कुटुंब एका टोकाला आणि भाग्यलक्ष्मीचं कुटुंब एका टोकाला असं विरुद्ध स्वभावाचे. इथून खरी चित्रपटाची कथा सुरु होते. आता पुढे त्यांच काय होतं हॅपी एन्डीग मिळते की नाही? हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.


हेही वाचा : 'twitter भइया ! अब तो पैसा भी भर दिये हैं हम ...', Blue Tick परत द्या म्हणत Amitabh Bachchan यांची भन्नाट पोस्ट


चित्रपटातील डायलॉग विषयी बोलायचे झालं तर चित्रपटात एकामागे एक असे भन्नाट डायलॉग्स आहेत. 'अच्छी तरह समझाया, अब बुरी तरह मारूंगा.' हा डायलॉग तर प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा आहे.  सलमानची भूमिका तर त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरणारी आहे. लग्नाच्या विरोधात असणारा भाईजान कसा भाग्यलक्ष्मीच्या प्रेमात पडतो त्यानंतर व्हायलंट भाईजानला भाग्यलक्ष्मीचं साधं भोळं कुटुंब स्विकार करतील की नाही हे चित्रपटाच्या शेवटीच तुम्हाला कळेल. तर या चित्रपटातील राम चरणची पाहुण्या कलाकाराची भूमिका ही सगळ्यात जबरदस्त आहे. 



फरहाद सामजी यांनी हा रिमेक असला तरी त्यातील बऱ्याच गोष्टी बदलून दाखवला आहे. दोन्ही चित्रपट हे एकसारखे आहेत हे अखेरपर्यंत कळत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीलाच अॅक्शन, कॉमेडी, गाण्यांनी सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. तर भाईजान आणि त्याच्या भावांमध्ये असलेलं प्रेम या चित्रपटाचा हायलाईट पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटातील गाण्यांनी आधीच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. चित्रपटात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री अप्रतिम आहे. त्यांच्याशिवाय चित्रपटातील पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आणि जस्सी गिल यांनी दमदार अभिनय केला आहे. त्याशिवाय वेंकटेश आणि रोहिणी हट्टंगडी यांचा तर अप्रतिम अभिनय चित्रपटात पाहायला मिळत आहे. तर शहनाज गिलचा अभिनय इतका खास नव्हता. तिच्या अभिनयानं अनेकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. 


Zee 24 Taas कडून किसी का भाई किसी की जान चित्रपटाला साडेतीन स्टार