‘लव्हरात्री’मध्ये दिसणार सलमानचा मेहुणा आयुष शर्मा!
सिनेसृष्टीत सेट झालेल्यांचे नातेवाईकही आता बॉलिवूडमध्ये एंट्री करताना दिसत आहे. असाच
मुंबई : सिनेसृष्टीत सेट झालेल्यांचे नातेवाईकही आता बॉलिवूडमध्ये एंट्री करताना दिसत आहे. असाच
आता सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. सलमान खानने आज आपल्या टिष्ट्वटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली. एसके फिल्म्स प्रॉडक्शनचा पाचवा चित्रपट ‘लव्हरात्री’मधून आयुष शर्मा दिसणार, हे जाहिर करताना आनंद होतोय, असे सलमानने लिहिले आहे. आयुषचा हा चित्रपट अभिराज मिनावाला दिग्दर्शित करणार असल्याची माहितीही सलमानने दिली आहे.
आम्ही आयुष शर्माचा डेब्यू चित्रपट प्रोड्यूस करतोय. येत्या फेबु्रवारीपासून याचे शूटींग सुरु होईल. २०१८ च्या अखेरिस हा चित्रपट रिलीज होईल, असे सलमानने सांगितले होते.
कोण आहे आयुष शर्मा?
आयुष शर्मा हा भाईजान सलमानची लाडकी बहीण अर्पिता खानचा पती आहे. अर्पिताच्या लग्नापासून आयुषच्या बॉलिवूड डेब्यूबाबत बातम्या येत होत्या. पण कदाचित मधल्या काळात सलमानने मेहुण्याचा डेब्यू तितका मनावर घेतला नव्हता. पण मग अर्पिता नाराज झाली. आपला भाऊ आपल्या पतीला लॉन्च करण्यास टाळाटाळ करतोय, असा तिचा समज झाला. मग कुठे सलमान खाडकन जागा झाला आणि कामाला लागला. आता तर सलमानने बहिणीला दिलेले वचन पाळले, असे म्हणावे लागेल.