Aaradhya Bachchan Meet Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. अनेक कार्यक्रमांना ऐश्वर्याने अभिषेकशिवाय हजेरी लावली होती. 

 

दरम्यान, आता सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन सलमान खानला भेटताना दिसत आहे. या व्हायरल फोटोमध्ये आराध्या सलमान खानला मिठी मारताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकूळ घातला असून चाहत्यांमध्ये या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील दोघांचा फोटो पाहून धक्का बसला आहे. 

 

'सिकंदर' च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमानची भेट?

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सलमान खान आणि आराध्या बच्चन फोटो 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरील आहे. आराध्यासारखी दिसणारी मुलगी सलमान खानला भेटून त्याला मिठी मारत असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये सलमान खानही खूप आनंदी दिसत आहे. सध्या हा फोटो पाहून आराध्या बच्चन सलमान खानला भेटायला का अली? असा देखील प्रश्न सर्वांना पडला असेल. सध्या दोघेचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या फोटोंवर चाहते देखील तुफान कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

 

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये नेमकं कोण? 

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले आराध्या बच्चनचे हे फोटो बनावट आहेत. खरं तर, या फोटोमध्ये दिसणारी मुलगी आराध्या बच्चन नसून ती भारतीय बॉक्सर निखत जरीन आहे. व्हायरल फोटोमध्ये कोणीतरी निखतचा चेहरा बदलून त्या ठिकाणी आराध्या बच्चनचा फोटो लावला आहे.

 

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता सत्यराजही मुख्य भूमिकेत असणार आहे. सलमान खान आणि रश्मिका यांचा हा चित्रपट 30 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या या चित्रपटाची चाहत्यांना देखील प्रचंड उत्सुकता लागली आहे.