पुणे :अभिनेता सलामान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते  तासन तास आनंदाने वाट बघतात. असे अनेक प्रसंग जगभरात त्याच्या फॅन्सला आले आहेत. आबालवृद्धांमध्ये असणारे त्याचे हे फॅन फॉलोविंग नेहमीच वाढते आहे.  


 पिंपरीतही तोबा गर्दी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सलमान खान पिंपरीमध्ये एका प्रसिद्ध दागिन्यांच्या शोरूमच्या उद्घाटनाला गेला होता. संध्याकाळी पाच वाजता येणारा सलमान रात्री उशिरा पिंपरीत पोहचला. दरम्यान त्याची एक झलक पाहण्यासाठी चहत्यांनी तोबा गर्दी केली होती. 
 
 रात्री नऊ वाजता सलमान अवघ्या 10 मिनिटांसाठी थांबला. त्यानंतर गर्दीला अभिवादन करून लगेच परतला. 


91 वर्षीय आजी फॅन  


सलमान खानची फॅन फॉलोविंग तगडी आहे. सलमान खानला भेटण्यासाठी एक 91 वर्षीय आजीबाई हैदराबादहून आल्या होत्या. मात्र चाहत्यांच्या गर्दीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी दहा मिनिटात काढता पाय घेतला. परिणामी 91 वर्षीय आजीबाईंची सलमान खानशी भेट झाली नाही.