मुंबई : आपल्या जबरदस्त डान्स आणि अभिनयाने सर्वांना घायाळ केलेल्या हेलन यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक  सिनेमांच्या माध्यमातून हेलन प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. अखेर त्या मधुर भंडारकर यांच्या 'हिरोइन' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या, 'हिरोइन' सिनेमानंतर त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. पण आता हेलन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी पुन्हा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलन अनेक वर्षांनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. पण आता त्या मोठ्या पडद्यावर नाही, तर एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे हेलन यांचे चाहते पुन्हा त्यांना नव्या भूमिकेत पाहाण्यासाठी उत्सुक आहेत. 


हेलन 'ब्राऊन' वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजद्वारे हेलन जवळपास दशकानंतर पुन्हा पडद्यावर कमबॅक करणार आहेत. ही वेब सीरीज कोलकाता शहरावर आधारित आहे.



'ब्राउन - द फर्स्ट केस'मध्ये करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सिरीज अभिक बरुआ यांच्या 'सिटी ऑफ डेथ' या पुस्तकावर आधारित आहे. या वेबसीरीजमध्ये सूर्या शर्माही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.


हेलन यांनी व्यक्त केल्या भावना
मी सुरूवातीला सर्व काही पाहून घाबरली, कारण आता गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. बदल चांगले आहेत, पण माझ्यासाठी नवीन आहेत. कमी शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, आकर्षक आहेत... असं मत हेलन यांनी व्यक्त केलं आहे.