Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जेव्हापासून गॅंग्सटर लॉरेन्स बिष्णोईनं जिवेमारण्याची धमकी दिली तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. खरंतर गॅंग्सटर लॉरेन्स बिष्णोईनं सलमानला ही धमकी 1998 मध्ये काळवीटाची शिकार केल्याच्या प्रकरणावरून दिली आहे. लॉरेन्सनं सलमान खानला सांगितलं आहे की जर त्यानं बिष्णोई समाजाची माफी मागितली तर त्याला काही होणार नाही. आता लॉरेंस बिष्णोईच्या चुलत भावानं एक मोठा दावा केला आहे. त्यानं म्हटलं आहे की सलमाननं त्यांच्याकडे ब्लॅंक चेक घेऊन आला होता. 


लॉरेन्सच्या चुलत भावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉरेन्सचा चुलत भाऊ रमेशनं एनडिटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे. रमेशनं सांगितलं की "सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी आरोप केला की लॉरेन्सनं हे सगळं पैशांसाठी केलं आहे. मात्र, तसं नसून बऱ्याच वर्षांपूर्वी सलमान खान हा हे प्रकरण तिथेच संपवण्यासाठी बिष्णोई समाजाला पैश्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न करत होता. बिष्णोई समजासमोर सलमान एक 'ब्लॅंक चेक बूक' घेऊन आला होता. त्यानं म्हटलं हवी ती रक्कम तिथे टाका आणि ते पैसे घ्या. जर आम्हाला पैशांची भूक असती तर आम्ही तेव्हाच पैसे घेतले असते. काळवीट प्रकरण समोर आल्यानंतर बिष्णोई समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रचंड राग आला होता. काळवीटाचा जीव वाचवण्यासाठी स्वत: च्या प्राणाची आहुती देण्यासाठी आमच्या समाजातील लोक तयार आहेत. " 


पुढे पैशांसाठी हे सगळं करत असल्याच्या सलीम खान यांच्या दाव्यावर रमेश म्हणाला, लॉरेन्सकडे भारतात 110 एकर जमीन आहे आणि तो इतका श्रीमंत आहे की त्याला कोणत्याही प्रकारे असे पैसे कमावण्याची गरज नाही. हे प्रकरण 26 वर्ष जुनं आहे, जेव्हा सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर त्यांच्यासोबत इतर कलाकार हे जोधपुरमध्ये 'हम साथ-साथ हैं' या चित्रपटाची शूटिंग करत होते. त्याचवेळी सलमाननं काळवीटाची शिकार केल्याचं समोर आलं होतं. 


हेही वाचा : ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक


पुढे त्यानं सांगितलं की "जेव्हा सलमान खाननं काळवीटाची शिकार केली, तेव्हा प्रत्येक बिष्णोईचं रक्त हे सळसळ होतं. मात्र, आम्ही सगळं न्यायालयावर सोपवलं की ते आता यावर निर्णय घेतील. पण जर आमच्या समाजाची खिल्ली उडवली जात असेल, तर सहाजिकच आमच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला राग येईल. आज संपूर्ण बिष्णोई समाज हा लॉरेन्ससोबत त्याला पाठिंबा देत उभा आहे."