मुंबई : झगमगत्या विश्वात कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे casting couch. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने सांगितलं. casting couch  म्हणजे झगमगत्या विश्वातील काळं सत्य. कास्टिंग काउचमुळे अनेक अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर गेल्या. चित्रपटसृष्टीतील कास्टींग काऊचबद्दल अनेक अभिनेत्री आपले अनुभव, विचार शेअर करत असताना त्याबद्दल दंबग खानने देखील आपले मत मांडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

casting couch  वर काय म्हणाला सलमान ?
याबद्दल सलमान म्हणाला की, आतापर्यंत कोणीही या विषयावर गंभीरपणे चर्चा केली नाही. मी या क्षेत्रात गेली अनेक वर्षे आहे आणि माझे वडील त्याआधीपासून. मात्र या विषयावर कोणीही सरळपणे बोललेले मी पाहिले नाही. परंतु, कोणालाही काम देण्यासाठी त्याचे शोषण करणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. पण जर एक सुंदर स्त्री-पुरूष एकमेकांशी फ्लर्ट करत असतील तर त्याची तुलना शारीरिक शोषणाशी करू नये. 



सलमान हिंदुस्थान टाईम्सच्या लिडरशिप समिटमध्ये बोलत होता. पुढे तो म्हणाला की, जर कोणी चित्रपटसृष्टीत अशाप्रकारे आला असेल तर हे अत्यंत वाईट आहे. कोणासोबत झोपल्याने एखाद्याला काम मिळाल्याचे मी ऐकले नाही.


लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला
सलमान खानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. १९८९ मध्ये आलेल्या 'मैंने प्‍यार किया' हा सलमालचा चित्रपट सुपरहीट ठरला. 


भाईजान लवकरच 'किसी का भाई किसी का जान', 'पठान', 'टायगर जिंदा है 3', 'गॉडफादर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.