`मी पोलिसांसमोर...`, 26 वर्ष जुन्या व्हिडीओवरून सलमान खानला होतोय पश्चाताप
Salman Khan Bigg Boss 18 : सलमान खाननं अखेर 26 वर्ष जुन्या त्या व्हिडीओवरून पश्चाताप होत असल्याचं सांगितलं.
Salman Khan Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' च्या वीकेंड वारला अभिनेता सलमान खाननं रजत दलाल आणि दिग्विजयला सल्ला दिला आहे. या दरम्यान, सलमान खाननं रजत दलालला त्याच्या पॉश्चरवर समजावलं. त्यासोबत त्यानं रजत दलालला सांगितलं की त्याच्या जुन्या केस विषयी बोलायला नको. सलमान खाननं रजत दलालला समजावत सांगत एका जुन्या व्हिडीओविषयी सांगितलं. त्यानं त्या व्हिडीओविषयी सांगितलं ज्यात तो एक पोलिस स्टेशनमध्ये बसल्याचं दिसतोय आणि त्यानं त्याच्या एका पायावर-पाय ठेवलाय. सलमान खाननं या व्हिडीओचा उल्लेख करत सांगितलं की आता वाटतं की बालपनी काय केलं.
सलमान खान यावेळी रजत दलालला त्याच्या बसण्याच्या पद्धतीवरून बोलताना दिसतो कारण रजत दलाल पायावर पाय ठेवून बसतो. यावर रजत दलाल म्हणतो की 'भाई ही सवय झाली आहे.' त्यावर सलमान म्हणतो की 'हो, मी समजू शकतो, माझी पण सवय होती. त्यानंतर सलमान म्हणाला, माझे व्हिडीओ आता व्हायरल होतात की मी पोलिसांसमोर कसा बसलो होतो, लोक म्हणायचे की किती उद्धट असल्या सारखा बसलाय... कारण मला वाटतं होतं की मी काही केलंच नाही, तर मी का घाबरू. पण जेव्हा कोणी सीनियर येतात, तेव्हा उभं राहणं, त्यांचा आदर करणं, ते आल्यानंतर त्यांचा आदर करत उभ राहणं. तर जेव्हा मी स्वत:चा तो व्हिडीओ पाहतो, तेव्हा मला स्वत: ला आवडत नाही. असं वाटतं की त्यावयात मी काय केलं. सलमाननं पुढे सांगितलं की आता माझी एक चालण्याची पद्धत आहे ती मी बदलू शकत नाही. लोकांचं म्हणणं आहे की त्यात अॅटिट्यूड दिसतो, पण तसं नाही.'
Look at Salman's attitude in police station
by inBollyBlindsNGossip
हेही वाचा : 'दो-तीन चित्रपट केले आणि...', नीलम कोठारीनं सांगितलं गोविंदासोबतच्या नात्याचं सत्य
सलमान खान ज्या व्हिडीओविषयी बोलत होता तो सलमान खान हा काळवीट शिकार प्रकरणाच्या वेळचा असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी सलमान खानला जोधपुर पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं होतं. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. पोलिस स्टेशनमध्ये अशा प्रकारे बसण्यावरून नेटकरी सलमानला सतत ट्रोल करत असतात.