Neelam Kothari on Relationship with Govinda : 90 च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्रींमध्ये नीलम कोठारीचं देखील नाव घेतलं जातं. नीलम कोठारी ही सुंदर आणि अप्रतिम अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबत तिचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. त्यात सगळ्यात जास्त चर्चा कसली झाली तर ती गोविंदा आणि तिच्या रिलेशनशिपची. गोविंदासोबत नीलमचं नाव जोडण्यात आलं होतं आणि यावर आता नीलमनं सत्य काय आहे ते सांगितलं आहे.
सध्या नेटफ्लिक्सवरील फॅब्युलस लाइफ वर्सेस बॉलिवूड वाइफ्समुळे नीलम कोठारी चर्चेत आली. सध्या हाउटरफ्लायच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदासोबतच्या नात्यावर नीलम कोठारेनं स्पष्टपणे सांगितलं आहे. मी कधीच माझ्या को-स्टारसोबत रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये राहिले नाही. मीडियानं या गोष्टीला वाढवून सांगितलं. मला वाटतं की लिंकअप हा एका खेळाचा भाग आहे. त्यावेळी सोशल मीडिया नव्हती आणि मीडियाला आम्ही खूप घाबरायचो, कारण अखेर लेखनीत किती ताकद असते हे माहित होतं. जर कोणी एकत्र दोन-तीन चित्रपटांमध्ये काम केलं, तर त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरू लागतात.
या पद्धतीनं नीलमनं गोविंदासोबतच्या नात्याला फक्त अफवा असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे 90 च्या दशकातील स्टारडस्ट मॅगझीनला दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदानं आपल्या आणि नीलमच्या नात्यावर स्पष्टपणे वक्तव्य केलं आणि सांगितलं की यानंतर तो पत्नीसोबतचं लग्न मोडायला तयार होता. आता नीलमच्या वक्तव्यावर एक नवीन बाजू समोर आली आहे.
हेही वाचा : अभिषेक-ऐश्वर्याचं दुबईतील लग्झरी घरं पाहिलंत का? 16 कोटींच्या बंगल्याचे फोटो व्हायरल
गोविंदा आणि नीलम कोठारीची ऑनस्क्रीन जोडी ही त्या काळातील चित्रपटांमधील हिट जोडी समजली जात होती. चाहत्यांना त्या दोघांना एकत्र पाहणं पसंत होतं. लक्षवेधी गोष्ट म्हणजे नीलम आणि गोविंदानं एकत्र अनेक चित्रपट केले. 'लव 86', 'इल्जाम', 'खुदगर्ज' आणि 'घराना' या चित्रपटांमध्ये काम केलं.दरम्यान, आता या सगळ्यात नीलम कोठारेनं 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या Fabulous Lives of Bollywood Wives या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे.