नवी दिल्ली : दबंग खान सलमान खान आणि बच्चन बहू ऐश्वर्या राय यांच्यातील तणाव रसिकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. सलमानसोबत काम करण्यास ऐश्वर्याचा ठाम नकार असतो. म्हणूनच कदाचित ती आपल्याला पदमवतीच्या भूमिकेत दिसू शकली नाही. हे दोघे एकमेकांना कितीही टाळत असले तरी पुढच्या वर्षी त्यांना एकमेकांना टक्कर द्यावीच लागणार आहे. कारण सलमानचा 'रेस 3'  हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दरमान्य ऐश्वर्याचा 'फॅनी खान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिड डेच्या प्रकाशित वृत्तानुसार चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, "आम्ही 'फॅनी खान' हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला म्हणजेच १५ जूनला प्रदर्शित करणार आहोत. चित्रपटाची मुख्य भूमिका ही  'फॅनी खान' असून ती व्यक्तिरेखा मुस्लिम असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. तसंच हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी याव्यतिरिक्त दुसरी चांगली संधी असूच शकत नाही."


त्यामुळे स्वाभाविकच दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगेल. आणि कोण कोणावर भारी पडेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच असेल. तसंच दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी स्टार कास्ट असल्याने याचा अंदाज बांधणे देखील काहीसे कठीण आहे. 


ट्रेंड एक्स्पर्ट काय म्हणताय ?


मिड डे शी बोलताना एका ट्रेंड एक्स्पर्टने सांगितले की, "दोन्ही चित्रपटातील सामना काहीसा रंजक असणार आहे. कारण सलमान आणि ऐश्वर्याचे नाते तुटल्यानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच येणार आहे. सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत असले तरी ऐश्वर्या आणि अनिल कपूरचे चाहते देखील कमी नाहीत.  सलमानचा 'रेस 3'कधी प्रदर्शित होणार हे 'फॅनी खान' चित्रपटाच्या निर्मात्यांना माहित होते. मात्र त्यांचा आपल्या चित्रपटावर संपूर्ण विश्वास आहे."