मुंबई : 'हम फिट तो इंडिया फिट' हे चॅलेंज स्विकारल्यानंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सलमान खान जिममध्ये दिसत आहे. त्याने लिहिलं आहे की, स्वच्छ भारत तर मी फीट, मी फीट तर इंडिया फिट... या मॅसेजमधून सलमान लोकांना फिटनेसचा फंडा दाखवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. 52 वर्षाचा असला तरीही सलमान अगदी फिट आहे. हेल्थ आणि बॉडीच्या बाबतीत करोडो लोकं सलमानला आयडल मानतात. सलमान खान आजच्या तरूण कलाकारांना देखील मागे टाकतो. 



सलमान खानने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकदा सलमान खानने सायकल चालवताना आणि जिममध्ये जाताना दिसला आहे. आता सध्या सलमान बॅक टू बॅक सिनेमांमध्ये व्यस्त आहे. सिनेमांच्या बाबतीत सलमान खानचं 2020 पर्यंत शेड्युल बिझी आहे.