सलमान खानने उलगडलं तो `सिंगल` असल्याचं रहस्य !
बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खान याची ओळख आहे.
मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खान याची ओळख आहे.
सलमान खानला त्याच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो आणि हा प्रश्न म्हणजे सलमान लग्न कधी करणार?
लग्नाच्या प्रश्नाला पूर्णविराम
सलमान खान मुंबईत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबतच्या प्रश्नावर गंमतीदार उत्तर दिलं आहे. लग्नाचा खर्च लाखो-करोडोंमध्ये असतो. इतका खर्च मला परवडणार नाही त्यामुळे मी सिंगलच राहणार असे गंमतीशीर उत्तर देत त्याने लग्नाच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे.
आई वडिलांचे लग्न केवळ 180 रूपयात
सलीम खान यांनी अवघ्या 180 रूपयांमध्ये लग्न केले. त्यानंतर आम्हा पाच मुलांचा सांभाळ केला. पण आता लग्न ही गोष्ट खूपच खर्चिक झाली आहे ती मला परवडणार नाही असं सांगत पुन्हा सलमान खानने त्याच्या लग्नाचा विषय टाळला आहे.