मुंबई : बॉलिवुड वर्तुळात अभिनेता सलमान खान सदैव चर्चेत असतो. जगभरात त्याचे चाहते आढळतात. अनेकदा तर हा दबंग खान त्याच्या चित्रपटांपेक्षा इतर बऱ्याच कारणांनी सर्वांचं लक्ष वेधतो.  सलमान वादाच्या भोवऱ्यातही अडकल्याचं अनेकदा पाहिलं गेलं आहे. सध्याही भाईजान सोशल मीडियाच्या वर्तुळात असं काही करुन गेला की नेटकऱ्यांना एक नवा विषयच मिळाला. पण, यावेळी हा विषय सलमानबद्दल नसून, त्याच्या वडिलांबद्दल आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचे वडील म्हणजे सलीम खान यांनी एक गाणं सादर करतानाचा व्हिडिओ सलमानने शेअर केला आहे. ज्यामधील सलीम खान य़ांचा अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.  अवघ्या १५ तासांमध्ये या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत काही निवांत क्षण व्यतीत करत आहे. शिवाय तो या खास क्षणांचे व्हिडिओसुद्धा चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 


असाच एक व्हिडिओ त्याने मंगळवारी शेअर केला. ज्यामध्ये सलमानचे वडील, सलीम खान हे 'सुहानी रात ढल चुकी'  हे गाणं गाताना दिसत आहेत. व्हिडिओला सलमानने त्यांच्या इन्टाग्राम अकाऊटवर शेअर केलं आहे आणि कॅप्शनमध्ये सलमानने लिहलं आहे की, 'माझ्या कुटुंबातले टाइगर, सुल्तान आणि भारत हे गाणं गात आहेत'.


सलमानही या गाण्यात त्यांना साथ देत आहे. सेलिब्रिटी बाप- लेकांचा हा अंदाज चांगलाच व्हायरलही होत आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गीत सादर करतेवेळी सलीम खान यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा आहे.