मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्यांच्या सगळ्याच चित्रपटांचे जगभरात बेव प्रसारण करण्याचा एक विशेष करार अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मॅनेजमेंटसोबत केलाय. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाची सुरूवात 'ट्यूब' या चित्रपटांच्या प्रसारणांबरोबर झाली. याच करारानुसार, सलमान खानच्या व्हेंचर्स  आणि इतर चित्रपटाचे वेब प्रसारण करण्याचा अधिकार अमेझॉन प्राइम व्हिडिओकडे असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचे चित्रपट सिनेमागृहात लावल्यानंतर त्याचे पहिले वेब प्रसारण अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मंचावर होणार आहे... आणि ते टीव्ही किंवा अन्य कुठल्याही उपग्रह वाहिनीवर दोन महिने आधीच प्रसारण करण्याचा अधिकार या वितरण सेवेकडे आहे.


सलमानने निवेदनात म्हटले, अमेझॉन प्राइम व्हिडिओचा विस्तार हा २०० देशांपर्यंत आहे. तर मला त्यांच्याशी करार करायला आणि भारतीय चित्रपट हा सगळ्या जगभर जाणार आहे याचा मला आनंद आहे. तर अमेझॉन प्राइम व्हिडिओचे प्रमुख नितेश कृपलानी यांनी म्हटले की, सलमान हा सर्वांत मोठ्या स्टारमधून भारतात एक आहे. त्याचे चाहते हे जगभरात आहेत.


सलमान खानचे बजरंगी भाईजान, किक, जय हो आणि हिरो यांसारखे काही जुने चित्रपटसुध्दा अमेझॉनच्या या मंचावर दाखवले जाणार आहे.