Salman Khan Dharmendra: काही दिवसांपुर्वीच हेमा मालिनी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी सेलिब्रेटींची व्हिडीओ, फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यांच्या फोटोंची जोरदार चर्चा रंगलेली होती. यावेली सलमान खाननं विशेष हजेरी लावली होती. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा होती. सलमान खानची तशीही अनेकदा जोरात चर्चा रंगलेली असते. परंतु यावेळी सलमानची कृती पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या या कृतीकडे पाहिल्यावर तुम्हीही त्याचे कौतुक कराल हे नक्की. चला तर मग जाणून घेऊया की नक्की त्यानं असं केलंय तरी काय? सलमान खान आपल्याला चांगल्या स्वभावासाठीही ओळखला जातो. तो आपल्या मित्रांची, सहकलाकारांची मदत करायलाही कायमच तत्पर असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा मालिनी यांचा वाढदिवस आणि सलमानची ती कृती : 


यावेळी हेमा मालिनी यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की त्या जशा नखशिखान्त नटल्या होत्या. त्यावरून त्यांच्या सोंदर्याची तुम्हाला कल्पना येईलच. सध्या सलमान खानचीही बरीच चर्चा होती. सध्या त्याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याच्या या व्हिडीओनं सर्वाचंच मनं हे जिंकून घेतले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे त्याच्या या प्राजंळ स्वभावाची. सध्या त्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


हेही वाचा : विजयच्या कपड्यांकडे लक्ष देतेय, त्याची काळजी घेतेय; तमन्नाचा 'हा' व्हिडीओ पाहिलात का?


बराच वेळ त्यांच्या पायाशी बसून होता : 


यावेळी रिपोर्ट्समधून असे समजते की, धर्मेंद्र यांनी यावेळी आपल्या तरूणपणातले किस्से त्यांना ऐकवले होते. त्यासोबत धर्मेंद्र आणि सलमान खान यांच्यातही अनेक गप्पा झाल्या. यावेळी सलमान खानही वेळेवर या ठिकाणी उपस्थित होता. तेव्हा त्यानं हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यासमवेत चांगला वेळही घालवला. यावेळी सलमान खान हा त्यांच्या पायाशी निदान 15 मिनिटे तरी बसून होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा ही रंगलेली होती. यावेळी असं वाटतं होतं की दोघं बापलेक यावेळी येथे बसले आहेत. त्यांनी एकत्र सिनेमेही केले आहेत. यावेळी बऱ्याच दिवसांनी त्यांच्यातील हे बॉण्डिंग पाहायला मिळाले होते.