मुंबई : भाईजान सलमान खानच्या आगामी 'दबंग ३' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरवरून चुलबुल पांडे अर्थात सलमान खानला ट्रोल करण्यात आलं आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचं लिहीलेल पण डिसेंबरची स्पेलिंग चुकिची असल्यानं सलमान ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दबंग ३' मधून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने चित्रपटविश्वात पदार्पण केलं आहे. ट्रेलरमधील काही सीन्समध्ये सलमान आणि सईची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. गेल्या दोन चित्रपटांप्रमाणेच 'दबंग ३'मध्येही सलमानसोबत रज्जो अर्थात सोनाक्षी सिन्हाची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. 


सलमान कितीही ट्रोल झाला तरीही त्याच्या चाहत्यांना 'दबंग ३' चित्रपटाचे विषेश आकर्षण आहे.  रोमान्स, अॅक्शन, डान्स, म्यूझिकसह चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दबंग ३'च्या ट्रेलरनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.