मुंबई : प्रियंका चोप्राने भारत सिनेमा सोडल्यानंतर आता प्रियंकाऐवजी या सिनेमात कोणाची वर्णी लागणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. पण आता प्रियंकाऐवजी कतरिना कैफ भारत सिनेमात झळकणार आहे. बॉलिवूड दंबग खानने केलेल्या ट्वीटमुळे सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.


सलमानच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियात धुमाकूळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री सलमान खानने एक खास ट्वीट केले. त्यात त्याने लिहिले की, सुंदर आणि सुशील मुलगी जिचे नाव आहे कतरिना कैफ. भारत च्या जिवनात तुझे स्वागत आहे. सलमानच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना ऊत आला आहे. अनेकजण या ट्वीटचा संबंध त्यांच्या अफेअरशी जोडत आहेत.



सुपरहिट जोडी


सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट आहे. यापूर्वी टायगर झिंदा है मध्ये या जोडीने सलमान-कतरिनाच्या जोडीने कोटींची कमाई केली. 


भारत सिनेमात कतरिना आणि सलमान खान शिवाय दिशा पटानी, तब्बू आणि सुनील ग्रोवर प्रमुख भूमिकेत आहेत. सुत्रांनुसार, दिशा पटानी भारत सिनेमात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. तर सलमान आणि कतरिना वेगवेगळ्या पाच लूकमध्ये दिसतील. 


प्रियंकाचा नवा सिनेमा


सिनेमात अनेक कलाकार जोडले गेल्यामुळे प्रियंका चोप्रा नाराज होती आणि त्यामुळेच तिने हा सिनेमा सोडला असल्याचे आता समोर येत आहे. लवकरच प्रियंका फरहान अख्तरच्या 'द स्काय ईज पिंक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल.