मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेक कलाकारांना  हिंदी सिनेसृष्टीमध्ये पहिली संधी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता खान कुटुंबाचे एक भाग असलेल्या आयुष शर्माला हिंदी सिनेमात ब्रेक देण्यासाठी सलमान प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष हिंदी सिनेमात येणार अशी चर्चा होती. मात्र आता सलमान खान बॅनर्सखाली तयार होणार्‍या चित्रपटामध्ये आयुष  शर्मा झळकणार आहे.  


अभिराज मीनावाला  या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सलमान खानने ट्विटरवरून आयुषला शुभेच्छा देत तयारीला लाग... असा सल्लादेखील दिला आहे. 



 


'प्रेम रतन धन पायो', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान' आणि 'ट्यूबलाइट' या चित्रपटांमध्ये सलमान खान सोबत आयुषही हजर होता. आयुषने डान्स आणि अ‍ॅक्टींगसाठी विशेष तालीम घ्यायला सुरूवात केली आहे. तसेच काही वर्कशॉपमध्येही तो सहभागी झाला होता. 


आयुष सोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत अजुनही कोणतीच माहिती मिळालेली नाही. २०१८ महिन्यांत फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होईल तर वर्षाच्या अखेरीपर्यंत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे