मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 55 वर्षांचा झाला आहे. पण तरीही तो बॅचलर आहे. जेव्हाही त्याला लग्नाबद्दल विचारले जाते तेव्हा तो एकतर प्रश्न टाळतो किंवा तो  विषय बदलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दरम्यान, मीडियामध्ये बातम्या येत आहेत की, दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या घरची सून होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी समोर आल्यानंतर सोनाक्षी सलमानसोबत लग्न करणार असल्याचं अनेकांना वाटत होतं.कारण तिचं नाव अनेकदा सलमान खासोबत जोडलं गेल आहे. पण आता सोनाक्षीचं नातं खानसोबत जोडलं जाणार हे आता कन्फर्म झाल्याचं बोललं जात आहे.


पण तिचा विवाह अभिनेता सलमान खानसोबत नव्हे तर खान कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तिसोबत होणार आहे. ज्यात नाव बंटी सचदेबर असं आहे. बंटी हा सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानचा मेहुणा आहे. खरंतर सोनाक्षी आणि बंटी दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.



अशा परिस्थितीत आता दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेलची पत्नी सीमा खानचा भाऊ बंटी सचदेवा याचेही सोनाक्षीवर प्रेम आहे. त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्या नात्यावर आक्षेप नाही. बंटीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितले की, बंटी हा एक चांगला व्यक्ती आहे. पण तिला फक्त तिच्या बॅचलरहुडचा आनंद घ्यायचा आहे. बंटी सोनाक्षीसोबत पार्टीमध्ये अनेकदा दिसून येते.



बंटीचं सोनाक्षीसोबत लग्न झाल्यासं हे त्याचं दुसरं लग्न असणार आहे. बंटीचा एक घटस्फोट झाला आहे. 2009 मध्ये त्याने अंबिका चौहानशी लग्न केले. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 4 वर्षांनी ते वेगळे झाले. तो अनेक दिवसांपासून सोनाक्षीला डेट करत आहे पण आतापर्यंत दोघांचीही एंगेजमेंट झालेली नाही. सोनाक्षीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाची बातमी मीडियामध्ये प्रसिद्ध केली आहे. हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांच्या ही नजरा लागल्या आहेत.