सलमान खानला विरह... शेअर केली भावनिक पोस्ट
पाहा ही भावनिक पोस्ट
मुंबई : असं म्हटलं जातं की, माणसाचा सगळ्यात इमानदारसोबती म्हणजे कुत्रा. त्याचा हा पाळीव प्राणी त्याच्या अगदी जवळचा असतो. सध्या सलमान खानच्या याच जवळच्या पाळीव प्राणाचा विरह त्याला सहन होत नाही. सलमान खानचा जवळचा सोबती त्याला सोडून गेला आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान कायमच सोशल मीडियावर आपल्या पेट डॉग्सचा फोटो शेअर करत असतो. सलमान खानने ही दुःखद बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सलमान खानने अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.
सलमान खानने एका फोटोत आपल्या पेट डॉगचा फोटो शेअर केला आहे. आणि तो सुपरस्टारच्या अटेंशनला खूप एन्जॉय करत आहे. त्या डॉगच्या गळ्यातही तशीच चैन आहे जशी चैन सलमान खानच्या हातात आहे. याच कॅप्शनमध्ये सलमान खानला त्याच्या आयुष्यातील 'प्यार' म्हणजे त्याच्या जवळच्या पेट डॉग कायमचा सोडून गेला आहे.