मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. काळवीट शिकार प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा झाली. त्याची रवानगी जोधपूर जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमानला दोन दिवस जेलमध्ये काढावे लागले. सुरूवातीला गप्प गप्प असणारा सलमाननंतर नॉर्मल झाला आणि गार्ड्ससोबत मज्जामस्ती करु लागला. तेव्हा बोलताना सलमान म्हणाला की, सैफ अली खान आणि इतर स्टार्सने मिळून फसवले आहे.


असा गेला सलमानचा दुसरा दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने शुक्रवारी सकाळी काही खाल्ले नाही पण दुपारी तो जेवला. त्यानंतर तो झोपला. संध्याकाळी उठल्यानंतर त्याने व्यायाम केला आणि नंतर चहा प्यायला.
जेलमध्ये रात्रीच्या वेळेस चपाती, चण्याची डाळ आणि दुधीची भाजी जेवणासाठी होती. पण रात्री सलमान जेवला नाही. दुपारी सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा जेलमध्ये सलमानसाठी जेवण घेऊन आल्या होत्या. मात्र त्यांना तसे करण्याची परवानगी देण्यात आली नाही. 


गार्ड्ससोबत मज्जामस्ती


त्यानंतर तो गार्ड्ससोबत मज्जामस्ती करु लागला. तेव्हा त्याला लग्नाबद्दल छेडले असता तो म्हणाला की, आधी मुलं मग लग्न. हे सगळे असले तरी तो मच्छरांपासून खूप हैराण आहे. तसंच त्याला अजूनही जेलची वर्दी देण्यात आली नाही.