महाराष्ट्रातील 'या' गावात 2 तास उशीरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त; निसर्गाचा अद्भूत चमत्कार

सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेल्या या अनोख्या गावाची कहानी खूपच रंजक आहे. 

वनिता कांबळे | Jan 30, 2025, 00:06 AM IST

Fofsandi Village Ahmednagar:  महाराष्ट्र हा निसर्ग सैंदर्याने नटलेला आहे. याच महाराष्ट्रात एक अनोखं ठिकाण आहे.  महाराष्ट्रात एक असं गाव आहे 2 तास उशीरा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. जाणून घेऊया हे अनोखं गाव कुठे आहे.

1/7

महाराष्ट्रात सर्वत्र एकाचवेळी सूर्योदय आणि सूर्यास्त होते. मात्र, एक असं अनोख गाव आहे जिथे   तास उशीरा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. या अतिदुर्गम गावात निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळतो.    

2/7

भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात जात असे. तेव्हा पासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असे झाले. 

3/7

मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे.

4/7

या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य या गावात आढळते.   

5/7

चौफेर डोंगरामध्ये दरीत वसलेल्या फोफसंडी गावात उशिराने सूर्यदर्शन होते. तर या गावात सूर्योदय देखील उशीराने होतो. 

6/7

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वायव्येला दुर्गम आदिवासी भागातील कोंबडकिल्ला- कुंजीरगडाच्या पायथ्याशी  फोफसंडी हे गाव आहे. 

7/7

या अनोख्या गावाचे नाव फोफसंडी असे आहे. फोफसंडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेले आहे. हे गाव स्वर्गाहूनही सुंदर आहे.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x