मुंबई : दबंग खानकडे दीड दिवसांसाठी गणपतीचे आगमन होते, हे आपल्या सगळ्यांच ठाऊक आहे. त्याचे 'बाप्पा प्रेम' आपण सगळे जाणतोच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या व्यस्त दिनक्रमातून बाप्पासाठी तो अवश्य वेळ काढतो आणि दरवर्षी न चुकता बाप्पाच्या आगमनादिवशी हजर राहतो. सलमानची ही श्रद्धा, भक्ती अनेकांना भारावून टाकते.  तर काही वेळा यासाठी त्याच्यावर टीका देखील झाली आहे. परंतु, सलमानचे बाप्पा प्रेम किंचितही कमी झालेले नाही. 


तो दरवर्षी नियमितपणे बाप्पाची प्रतिष्ठापना करतो. परंतु, सध्या तो त्याच्या आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त अबुधाबीला आहे. तरी देखील केवळ बाप्पाच्या स्वागतासाठी त्यानं एक दिवस शूटिंग पुढं ढकलल्याचं म्हटलं जातंय. दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन झालं, की लगेच तो अबूधाबीला परत जाणार असल्याचं समजतं.