मुंबई : सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर 'सलमान सोसायटी' चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटिला आली होती आणि ती लोकांच्या पसंतीत ही उतरलेली. चित्रपटाचा विषय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना खुप आवडला असून चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आठवले यांनी शिक्षणाचा विषयावरती चित्रपट आहे म्हणून याचं भरभरून कौतुक केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा अभ्यास केला आणि आपल्या चित्रपटांमधून मुलं कशी शिक्षण घेतात यावरती भाष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांनी चित्रपट डोक्यावर घेतला असून जबरदस्त असा या सिनेमाला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत सिनेमागृहात येत असून यामध्ये लहान मोठ्यांचा समावेश आहे. सर्वाना चित्रपटातील संगीत आणि सर्वच कलाकारांचा अभिनय आवडत असून दिग्दर्शनाचं आणि पटकथेचं कौतुक केलं आहे.


तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत आणि दिग्गज कलाकार दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता उपेंद्र लिमये अंशुमन विचारे , विजय पाटकर , पुष्कर जोग, अभिजीत श्वेतचंद्र,शिल्पा तुळसकर, कमलेश सावंत यांनी ही शुभेच्छा देत हा चित्रपट सर्वानी बघावा ही विनंती केली आहे.


सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिलं असून डीओपी फारूक खान आहेत . या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसला आबे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत आहेत


चित्रपटा मध्ये उपेंद्र लिमये पहुण्या कलाकारच्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित झाला असून म्यूजिक व्हिडियो पॅलेसवर उपलब्ध आहे.