सलमान आता `या` अभिनेत्रीचे करिअर सावरणार
बॉलिवूडमध्ये दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच अनेकाचा गॉडफादर राहिला आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच अनेकाचा गॉडफादर राहिला आहे. आता सलमान अभिनेत्री सना खानचे करिअर रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 'जय हो' चित्रपटातही सलमानने सना फार मदत केली होती. याआधी सना 'बिग बॉस' शोच्या 6 व्या भागात झळकली होती. आता ती 'नच बलिये' च्या पुढील भागात दिसणार आहे. त्यासाठी ती विशेष मेहनत घेत आहे. शोमध्ये ती बॉयफ्रेंड मेल्विन लुइससह थिरकताना दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मे महिन्यापासून 'नच बलिये 9' भाग सुरू होणार आहे. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसखाली 'नच बलिये 9' शोची निर्मिती होणार आहे. सध्या सलमानची प्रॉडक्शन कंपनी कपिल शर्माच्या शोला निर्मित करत आहे. विशेष म्हणजे या शोचे परीक्षण सलमान आणि कतरिना कैफ करणार आहे. काही दिवसांसाठी हे दोघे शोचे परीक्षक म्हणून झळकणार आहे.
'नच बलिये'च्या मागच्या भागात दिव्यांका त्रिपाठीने पुरस्कारावर स्वत:चे नाव केरले होते. 'नच बलिये' या शोची सुरूवात 2005 साली झाली होती. अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या मराठमोळ्या जोडीने पहिला पुरस्कार मिळवण्याचा बहुमान मिळवला होता.