मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या 'दबंग ३' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दबंग चित्रपटाचे दोन्ही भाग चाहत्यांच्या पसंतीस पडले परंतु 'दबंग ३' भोवती अडचणींचं सावट आहे. तर दुसरीकडे 'दबंग ३' चित्रपटातील मुन्ना बदनाम हुवा' गाणं प्रदर्शित केलं. काही दिवसांपूर्वी त्याने गाण्याची ऑडिओ क्लिप प्रदर्शित केली होती.  चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, मेकिंग व्हिडिओ आणि आता प्रदर्शित होत असलेले गाणे चाहत्यांचं मन जिंकत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर निर्मात्यांनी 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्याला प्राधान्य दिले आहे. 
 
'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्याला गायक बादशाहा, कमाल खान, ममता शर्मा यांनी आवाज दिला आहे. तर प्रसिद्ध गीतकार साजित-वाजिद यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. महत्तवाचं म्हणजे या गाण्यामध्ये अभिनेत्री मलायकाची जागा 'लवयात्री' फेम अभिनेत्री वरीना हुसैनने घेतली आहे. 


येत्या २० डिसेंबर रोजी 'दबंग ३' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंगही करता येणार आहे. त्यामुळे 'दबंग' 'दबंग २'प्रमाणेच 'दबंग ३'लाही प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.