`... तर आमिर मला मारून टाकेल` आमिर खानच्या अफेयर्सवर सलमानचं वक्तव्य
`अंदाज अपना अपना` चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आमि आमिर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली.
मुंबई : बॉलिवूडचे तीन खान म्हणजे अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या चर्चा कायम रंगत असतात. अभिनयात रस असलेल्या प्रत्येकाला बॉलिवूडच्या तीन खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा असते. सलमान, शाहरूख आणि आमिर यांनी एकत्र देखील काम केलं आहे. 'अंदाज अपना अपना' चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आमि आमिर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. तेव्हा देखील आणि आताही खान बॉलिवूडवर राज्य करत आहेत.
दरम्यान, आमिर आणि सलमानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमानला आमिरच्या रिलेशनशीपबद्दल विचारण्यात आलं. आमिरच्या अफेयर्सबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्या खऱ्या आहेत का? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. यावर सलमानने अत्यंत मजेशीर उत्तर दिलं.
सलमान म्हणाला, 'ते सर्व अफेअयर्स आमिरचे नाही तर माझे आहेत. आमिर अत्यंत सरळ आहे. क्यूट आहे. तो प्रत्येक वेळी बोलत असतो मी माझ्या पत्नीवर फार प्रेम करतो. त्यामुळे तो वाचतो... ' शिवाय आमिर मला मारून टाकेल असं देखील सलमान म्हणत आहे.