Sam Bahadur Twitter Review: `सॅम मानेकशॉ` यांच्या भूमिकेत विकी कौशलनं जिंकली प्रेक्षकांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले...
Sam Bahadur Twitter Review: विकी कौशलच्या `सॅम बहादुर` या चित्रपटावर प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिला रिव्ह्यू
Sam Bahadur Twitter Review: बॉलिवूड अभिनेका विकी कौशलच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'सॅम बहादुर' हा चित्रपट आज 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली. सॅम बहादुर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमधील उत्साह चांगलाच वाढला आहे. भारताचे सर्वोत्कृष्ट युद्ध लिडर असलेल्यां पैकी एक म्हणजेच सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विकीची चांगलीच चर्चा सुरु आहे. चला तर जाणून घेऊया प्रेक्षकांनी ट्विटवर काय प्रतिक्रिया दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी सॅम बहादुर चित्रपटाची स्तुती करत आधीच्या ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यानी म्हटलं की 'जेव्हा कोणता देश असा चित्रपट बनवतो, जो त्यांच्या खऱ्या हीरोची गोष्ट सांगतो. तर ही तेव्हाच सगळ्यात मोठी गोष्ट होते. विशेषत: सैनिकांवर आणि नेतृत्व आणि धैर्याच्या कथांवर चित्रपट बनवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे लोकांचा अभिमान आणि आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो. जेव्हा लोकांना माहित असते की त्यांच्या धैर्याचे कौतुक केले जाईल, तेव्हा आणखी हीरो उदयास येतात. आमच्यासाठी असे चित्रपट बनवल्याबद्दल रॉनी स्क्रूवाला यांचे धन्यवाद. विकी कौशलनं अंगावर शहारे आणणारा अभिनय केला आहे. स्वत: चे रुपांतर सॅम बहादूरयांच्यात करणं हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. हा चित्रपट नक्कीच पाहा आणि भारतीय हीरोंची स्तुती करा.'
हेही वाचा : VIDEO : 'तारक मेहता...' ची सोनू झाली देसी गर्ल, अभिनेत्रीच्या डान्सवर चाहते फिदा
फक्त आनंद महिंद्रा नाही तर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'खरंच! आपल्या हिरोंना साजरा करण्यासारखं आहे. या चित्रपटात अभिमान आणि आत्मविश्वासाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. सॅम बहादूर हा खरोखरच पुरस्कारास पात्र असलेला चित्रपट आहे. प्रत्येकाने हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'खूप सुंदर! विकी कौशलचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार आहे. ज्या प्रकारे त्यानं सेना अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ते अप्रतिम आहे. तुम्ही ही भूमिका साकारली नाही, तर तू स्वत: अनूभव घेऊन जगलास. तुझी जितकी स्तुती करण्यात येईल तितकी ती कमी आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला कधी-कधी वाटतं की विकी कौशलचा चेहरा हा सगळ्याच भूमिकांप्रमाणे बदलताना दिसतो. याप्रकारे तो भूमिका योग्य प्रकारे आणि डेडिकेशननं साकारतो. त्याप्रमाणे तो ती भूमिका जगतो हे लक्षात येतं. आमच्या पीढीत असलेल्या खूप चांगल्या अभिनेत्यांपैकी विकी एक आहे. सॅम बहादुरमध्ये त्याचं काम खूप चांगलं आहे. सगळ्यांनीच हा चित्रपट पाहायला हवा.'