VIDEO : 'तारक मेहता...' ची सोनू झाली देसी गर्ल, अभिनेत्रीच्या डान्सवर चाहते फिदा

Sonu Aka Palak Sindhwani dance : सोनूनं केलेल्या डान्सवर चाहते घायाळ... व्हिडीओवर केल्या भन्नाट कमेंट 

दिक्षा पाटील | Updated: Dec 1, 2023, 12:13 PM IST
VIDEO : 'तारक मेहता...' ची सोनू झाली देसी गर्ल, अभिनेत्रीच्या डान्सवर चाहते फिदा title=
(Photo Credit : Social Media)

Sonu Aka Palak Sindhwani dance : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंतकाना दिसतात. याच मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली पलक सिंधवानीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पलक डान्स करताना दिसली आहे. त्यामुळे तिचा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. 

हा व्हिडीओ पलकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत पलकनं मरुन रंगाची साडी नेसली असून बॅकलेस ब्लाऊज परिधान केल्याचे पाहायला मिळते. ज्या गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले ते आहे तिचा चार्म आणि तिचा उत्तम डान्स. पलक यावेळी 'देसी गर्ल' या गाण्यावर डान्स करताना दिसली. तर पलकनं केलेल्या डान्सनं सगळ्यांनामध्ये एनर्जी वाढली इतकंच नाही तर नक्कीत सगळ्यांची डान्स करण्याची इच्छा झाली असेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत पलकनं कॅप्शन दिलं की पब्लिक डिमांडवर, माझ्या अचानक अशा डान्स परफॉर्मेंन्सची एक झलक! पीएस - साडी नेसली आणि डान्स केला नाही तर काय केलं? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पलक अभिनयाशिवाय सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे जेव्हा पलकनं हा व्हिडीओ शेअर केला तेव्हा त्यावर प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की 'पलक तू एखाद्या परीसारखा डान्स करतेस. आनंदी होऊन आणि आत्मविश्वासानं, खूप सुंदर डान्स केलास.' दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला की, 'या ग्रहावर असलेली सगळ्यात सुंदर मुलगी.' तिसरा नेटकरी म्हणाला, की 'खूप सुंदर डान्स करतेस पलक.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'व्वा तेरा क्या कहना!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'साडीत सुंदर दिसतेस पलक.'

हेही वाचा : Animal Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' नं मोडला 'टायगर 3' चा रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

दरम्यान, पलक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सोनूची भूमिका साकारते. तिची भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. तर ही मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. या मालिकेचे आतापर्यंत 3500 पेक्षा जास्त एपिसोड प्रदर्शित झाले आहेत.