मुंबई : मनोज बाजपेयी यांच्यासोबत 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सामंथा आणि पती नागा चैतन्य यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. चर्चा आहे की हे दोघेही एक कुटुंब सुरू करण्याचं प्लॅनिग करत होते. 
पण सामंथा आणि चैतन्यच्या घटस्फोटाच्या बातमीने साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता म्हटले जात आहे की, ती सामंथा अक्किनेनी आई होण्याचं स्वप्न पाहत होती. लवकरच ती चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर करण्याची शक्यता होती. सामंथा आणि नागा यांच्यातील बिघडत असलेल्या संबंधांमुळे फिल्म इंडस्ट्री चिंतेत आहे. प्रत्येकाला माहित आहे की अभिनेत्रीला कौटुंबिक जीवन फार आवडते. तिला प्रत्यक्षात चैतन्यासह कुटुंब सुरू करायचे होते. त्यासाठी तिने अनेक प्रोजेक्ट देखील सोडले होते.



अहवालांमध्ये असे सांगितले जात आहे की 'ती नेहमी सामंथा नेहमी कुटुंबाला प्राधान्य देते. तिला कुटुंबाच्या सुरुवातीसाठी बॅलेंससाधायचा होता. अगदी त्याचे मित्र, निर्माते आणि अभिनेते सर्वांना माहित आहे की तिच्यासाठी कुटुंब किती महत्त्वाचे आहे.
घटस्फोटाच्या चर्चेला उधाण येण्याचं कारण म्हणजे जेव्हा अभिनेत्रीने तिच्या नावाच्या मागे असलेले तिच्या पतीचे आडनाव काढून टाकले आणि फक्त 'S' हे अक्षर ठेवलं.