मुंबई : नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर, समंथा रुथ प्रभू सतत चर्चेत आहे. अलीकडेच समंथाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने लिहिले आहे की ती कोणाच्या प्रेमात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समंथा कोणाच्या प्रेमात आहे, याबाबत अभिनेत्रीने काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आता या पोस्टच्या बाबत बोलत असताना अनेकांना वाटत आहे की समंथाने तिच्या जवळच्या व्यक्तीचा फोटो पोस्ट केला असेल. पण असं नाही.


समंथा कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात नाही, तर ती प्रिंटेड साडीच्या प्रेमात आहे. अभिनेत्रीने तिच्या कॅप्शनमध्ये याचा उल्लेख केला आहे.फोटोंमध्ये समंथा क्रीम कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.


या साडीची सुंदर गोष्ट म्हणजे ती कोणत्याही मशीनने नाही तर हाताने रंगवण्यात आली आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'या हाताने पेंट केलेल्या साडीच्या प्रेमात आहे'.


 सोबतच समंथाने फिल्म इंडस्ट्रीत 12 वर्षे पूर्ण केली आहेत, स्वतः अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.घटस्फोटानंतर आता अभिनेत्री तिचं काम आणि स्वत:च्या इच्छा पुर्ण करण्यात विशेष लक्ष देत आहे. ती एन्जॉय करताना दिसत आहे.


अभिनेत्रीने लिहिले, 'आज सकाळी मला जाग आली आणि मला जाणवले की मी सिनेइंडस्ट्रीत 12 वर्षे पूर्ण केली आहेत.



लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन आणि अनमोल क्षणांभोवती फिरणाऱ्या 12 वर्षांच्या आठवणी आहेत. 'आशा आहे की सिनेमासोबतची माझी प्रेमकहाणी कधीच संपणार नाही.'या पोस्टवरुन तिचं कामावरील प्रेम दिसून येत आहे.