Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला. मात्र आजही दोघांची चर्चा होते. अलीकडेच तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखा यांनी दोघांच्या घटस्फोटासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळं मनोरजंन व राजकीय क्षेत्रात मोठा गदारोळ माजला आहे. कोंडा सुरेशा यांनी म्हटलं आहे की, बीआरएसचे अध्यक्ष के टी रामा राव यांच्यामुळंच नागा आणि समांथा यांचा घटस्फोट झाला. यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांचा 2021मध्ये घटस्फोट झाला होता. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांच्याही घटस्फोटाबद्दल तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर समंथा आणि नागा चैतन्य यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संमथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खडे बोल सुनावले आहेत. तसंच, नागा चैतन्यनेही एक पोस्ट शेअर केली आहे. 


समंधाने सुनावले खडे बोल


समंथाने कोंडा सुरेखा यांना उत्तर देत म्हटलं आहे की, एक मंत्री म्हणून तुमच्या शब्दांना किती महत्त्व आहे याची तुम्हाला कल्पना असेलच. तुम्हाला दुसऱ्यांच्या खासगी आयुष्याचाही मान राखला पाहिजे. घटस्फोटही वैयक्तीक बाब आहे त्याला राजकारणापासून दूर ठेवणे उत्तम, असं म्हटलं आहे. 


समंथाने इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट लिहिली आहे, एक स्त्री असून घराबाहेर पडून काम करणे आणि ग्लॅमरस क्षेत्रात टिकून राहणे. ते हे अशा की जिथे महिलांना प्रॉप्ससारखे वागवले जाते. प्रेमात पडणे, ठेच लागणे आणि त्यानंतर पुन्हा उभं राहून लढणे यासाठी खूप हिंमत लागते. कोंडा सुरेखा गरु, मला माझ्या प्रवासाचा अभिमान आहे. कृपया त्यावर चिफलफेक करणे थांबवा. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही लोकांच्या खासगी आयुष्याबाबत जबाबदार राहून त्यांचा आदर बाळगावा. 



घटस्फोट हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी तुम्हाला विनंती करते की त्यावरुन नको त्या चर्चा करु नका. काही गोष्टी खासगी ठेवणे हा आमचा निर्णय होता. याचा अर्थ असा नाही की त्यावरुन चुकीच्या चर्चा कराल. मला इथे स्पष्ट करायचंय की माझा घटस्फोट हा दोघांच्या सहमतीने झाला आहे. यात राजकारणाचा काहीएक संबंध नाही. तुमच्या राजकारणापासून माझं नाव दूरच ठेवा, असं समंथाने म्हटलं आहे. 


नागा चैतन्य यानेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटलं आहे की, घटस्फोटाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात वेदनादायक आणि दुर्दैवी निर्णयांपैकी एक आहे. खूप विचार केल्यानंतर मी आणि माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या ध्येयांमुळं आम्ही हा निर्णय घेतला होता. मंत्री कोंडा सुरेखा गरु यांनी केलेला दावा खोटाच नाही तर निव्वळ हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. महिलांना पाठिंबा आणि सन्मान मिळायला हवा.