मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. समंथा आणि नागा चैतन्य 2017 साली लग्न (Samantha and Naga Chaitanya Got Married) बंधनात अडकले. लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट (Samantha and Naga Chaitnya Divorce) घेतला. दरम्यान, हे दोघं एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. समंथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी अलीकडेच लेकीचा आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समंथाचे वडील जोसेफ यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समंथानं पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर नागा चैतन्यनं काळ्या रंगाचा टक्सीडो परिधान केला आहे. दोघांनी एकमेकांचा हाथ पकडला आहे. फोटोत समंथाचे आई-वडील दिसत आहेत. (Samantha Ruth Prabhu s father shares her wedding pics with ex Naga Chaitanya  says it does not exist anymore) 



फोटो शेअर करत समंथाच्या वडिलांनी कॅप्शन दिले की, काही वर्षांपूर्वी एक कहानी होती आणि आता ती अस्तित्वात नाही. चला आता एक नवीन कहानी आणि एक नवीन अध्याय सुरु करूया!!! समंथाच्या वडिलांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये नेटकरी एकापाठोपाठ एक कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला,'ते पुन्हा एकत्र आले तर खूप आनंद होईल' फक्त ही एक कमेंट नाही तर अशा अनेक कमेंट करत ते दोघं एकत्र आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.  


दरम्यान, समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, समंथा तिच्या चाहत्यांसाठी हॉरर आणि सायन्स-फिक्शन चित्रपट घेऊन येणार आहे. 'यशोदा' नावाच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. नागा चैतन्यबद्दल बोलायचं झालं तर, तो अलीकडेच 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला.