मुंबई : अलीकडेच, अभिनेता वरुण धवन OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याच्या बातम्यांचा चर्चेत होत्या. वरुण धवनने Amazon Prime Video वर एक आगामी वेबसिरीज साईन केली आहे. ही वेब सिरीज अँथनी आणि जो रुसो यांच्या अमेरिकन ड्रामा सिरीज सिटाडेलची हिंदी आवृत्ती असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर या मालिकेत वरुणसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा होती. अशा परिस्थितीत वरुणसोबतच्या या थ्रिलर व्हेंचरमध्ये आता ज्या अभिनेत्रीचे नाव आहे ती म्हणजे साऊथ सेन्सेशन समंथा रुथ प्रभू.



वरुणसोबत स्क्रिन शेअर करणार 


रिपोर्टनुसार, या मोठ्या प्रोजेक्टमध्ये साऊथची अभिनेत्री समंथाला कास्ट करण्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे सांगितले जात आहे की अभिनेत्रीने वरुणसोबत काम करण्यास हिरवा सिग्नल देखील दिला आहे आणि लवकरच ही सिरिज आणि त्यातील कलाकारांबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.


सिटाडेल ही अमेरिकन ड्रामा सिरिज भारतीय पार्श्वभूमी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित करणार आहेत. वरुण पहिल्यांदाच अॅमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, तर समंथाने यापूर्वी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय मालिका द फॅमिली मॅन 2 मध्ये काम करून प्रशंसा मिळवली आहे.



अ‍ॅक्शन पॅक मालिका 
या मालिकेत भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. ज्यासाठी वरुण आणि समंथा यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही एक अ‍ॅक्शनपॅक मालिका आहे, त्यामुळे कलाकारांना मेहनत घ्यावी लागणार आहे.



रिपोर्ट्सनुसार, त्याचे शूटिंग 2022 मध्ये सुरू होईल. सिटाडेल ही अॅक्शन अॅडव्हेंचर स्पाय ड्रामा वेब सिरीज आहे. ज्याच्या अमेरिकन व्हर्जनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा काम करत आहे. यात प्रियांकासोबत रिचर्ड मॅडेन देखील दिसणार आहे.