मुंबई : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या वर्षीच तिचा नागा चैतन्यपासून घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही चित्रपटांमध्ये समंथाचे बोल्ड सीन आणि डान्स पाहून नागा खूश नव्हता. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, समंथाने नागा चैतन्यने देऊ केलेली २०० कोटींची पोटगी नाकारल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. तसं, समंथाची स्वतःची संपत्तीही कमी नाही, ती सुमारे 80 कोटींची मालकीण आहे. साऊथ इंडस्ट्रीत तिने आपलं स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.


समंथाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने आतापर्यंत 65 हून अधिक चित्रपट केले आहेत. हे स्थान मिळवणं समांथासाठी सोपं काम नव्हतं. तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेलं. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर समंथाच्या घरच्यांकडे तिला शिकवण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत सामंथाने मॉडेलिंगमध्ये हात आजमावला आणि अर्धावेळ मॉडेलिंग केलं आणि तिच्या अभ्यासासाठी आणि घर चालवण्यासाठी पैसे उभे केले.


मॉडेलिंगच्या माध्यमातूनच समांथासाठी चित्रपटांचा मार्ग खुला झाला. 11 वर्षांपूर्वी तिने ये माया चेसावे या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं आणि त्यानंतर ती यशाच्या पायऱ्या चढत गेली. गेल्या वर्षी फॅमिली मॅन २ मधील राजीच्या भूमिकेसाठी तिला खूप पसंती मिळाली. याशिवाय ‘पुष्पा २’ या ओ अंतवा या चित्रपटानेही तिची लोकप्रियता वाढवली.