मुंबई : पंबाजची कतरिना म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill). आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शहनाज. बिग बॉसनंतर शहनाजच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात शहनाजला खरं प्रेम तर मिळालं, पण त्या प्रेमाने शहनाजची अर्ध्यावर साथ सोडली. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं आणि साध्या, खोडकळ स्वभावामुळे शहनाज कायम चाहत्यांच्या मनात राहिली. एवढंच नाही तर, सिद्धार्थ आणि शहनाजच्या लग्नाच्या चर्चांनी देखील चाहत्यांमध्ये जोर धरला. .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली. अभिनत्यांच्या निधनानंतर दोघांचे अनेक जुने आणि नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता देखील सिद्धार्थ आणि शहनाजचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजच्या शरीरावर सारखी खूण दिसत आहे. सिद्धार्थ आणि शहनाजच्या उजव्या डोळ्याच्या भुवयांखाली एक सारखी खूण आहे. 


फोटो पाहून सिद्धार्थ आणि शहनाजचे चाहते कमेंट आणि लाईक्स करत आहेत. सध्या सर्वज्ञ दोघांच्या या फोटोची चर्चा आहे. आता शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता सलमान खानच्या सिनेमातून शहनाज चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगत आहे.