मुंबई : बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे अनेक फॅन्स आहेत. ते आपल्या सारख्या दिसणाऱ्या कलाकाराची प्रत्येक स्टाईल कॉपी करत असतात. त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. सलमान खान पाहून अमिताभ बच्चन पर्यंत अनेक कलाकारांचे ड्युप्लीकटे लोकं आहेत. बॉलिवूडचा डान्सिंग स्टार अभिनेता गोविंदाही (Govinda) आपल्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून हैराण झाला. एअरपोर्टवर त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून तो अवाक झाला. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता गोविंदा पत्नी सुनीता आहुजासोबत (Govinda Wife Sunita Ahuja) मुंबई विमानतळावर पोहोचला. तेव्हा एकजण अचानक पुष्पगुच्छ घेऊन त्याच्यासमोर आला. त्या व्यक्तीला पाहून गोविंदाही आश्चर्यचकित झाला. गोविंदाचा हा चाहता त्याच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना डोळ्यावर विश्वास बसत नाहीये की, इतकं कोणी कसं हुबेहुब असू शकतं.



गोविंदाने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दिसलेला हा अभिनेता सध्या काही वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. डान्स रिअॅलिटी शोमध्ये तो अनेकदा येतो. त्याची डान्सिंग स्टाईल त्याची एक वेगळी ओळख आहे. गोविंदा याने राजकीय क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं होतं. पण सध्या तो त्यापासून ही दूर आहे.


गोविंदाचे जगभरात चाहते आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. गोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी त्याचे चाहते त्याचा सिनेमाची वाट पाहत आहेत.